नेकनूर (प्रतिनिधी) :- येथील मिल्लत इंग्लिश स्कूल येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक बिलाल सर, प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेवक अझरुद्दीन जहागीरदार व राहील भाई हे होते.
या वेळी मुख्याध्यापक बिलाल सर यांनी संविधान कसे बनले, किती दिवस लागले, कोणी लिहिले, त्या संदर्भात पूर्ण माहिती मुलांना सांगितली. संविधानाचे महत्त्वाचे काय आहे हे स्पष्ट केले.
समारोप करताना आकेफ सर यांनी आपले हक्क व कर्तव्य या विषयी माहिती सांगितली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बिलाल सर मुफ्ती आदिल सर, हाफिज मेहफूज उर रहमान सर,अझरुद्दीन जागीरदार,राहील भाई सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी संविधानाचे वाचन घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
