बीड | प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत ऑनलाईन सट्टा खेळणाऱ्या जुगाऱ्यांवर छापा टाकला आहे. या कारवाईत सुमारे ५ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
गुप्त माहितीच्या आधारे धडक कारवाई
मा. पोलीस अधीक्षक बीड यांनी दिलेल्या आदेशानुसार, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, धुळे–सोलापूर हायवे रोडलगत घाटे यांच्या शेतामधील घरासमोरील उघड्या पत्र्याच्या शेडमध्ये ऑनलाईन जुगार सुरू आहे.
या माहितीच्या आधारे दि. २७ जानेवारी २०२६ रोजी रात्री ९ वाजता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला.
LOTAS 365 अॅपद्वारे बेकायदेशीर जुगार
छाप्यादरम्यान आरोपी LOTAS 365 या अॅपद्वारे विविध खेळांवर ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करून, लोकांना जास्त पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवत विनापरवाना बेकायदेशीर जुगार खेळत व खेळवत असल्याचे आढळून आले.
हे आरोपी ताब्यात
*वैभव आण्णासाहेब आमटे (वय 21) रा. खांडे पारगाव, ता. जि. बीड
*अभिषेक भारत आमटे (वय 23) रा. खांडे पारगाव, ता. जि. बीड
यांच्यासह अन्य सात आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
लॅपटॉप, मोबाईलसह मोठा मुद्देमाल जप्त कारवाईदरम्यान लॅपटॉप,टॅब,मोबाईल फोन
असा एकूण ₹5,26,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
सदर प्रकरणी पोलीस ठाणे बीड ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास चालू आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कारवाई
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक बीड, अप्पर पोलीस अधीक्षक बीड व स्थानिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदारांनी यशस्वीपणे पार पाडली.

