अवघ्या दहा तासांत खुनाचा छडा; स्थानिक गुन्हे शाखेची झपाट्याने कारवाई
बीड, दि. २ (प्रतिनिधी): शिरूर कासार तालुक्यातील रायमोहा येथे तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेचा उलगडा बीड स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या दहा तासांत करून आरोपीला अटक केली आहे. या जलद कारवाईमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. चांद अल्लाहुद्दीन तांबोळी (वय ३०, रा. रायमोहा) असे मृत तरुणाचे नाव…

